पुणे – मागील काही दिवसांपासून पुणे शहर (Pune) आणि परिसरात आगीच्या (Fire News) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल पुन्हा एकदा शहारत आगीची (Fire News) घटना आहे. पुणे शहरात (Pune) नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील वडगावशेरी परिसरात भीषण आग (Fire News) लागली होती.

वडगावशेरी येथील सोपान नगर येथे एका गोडाउनला ही आग (Fire News) लागली होती. अग्निशमनदलाच्या जवानांकडून बराच वेळ आग विझवण्याचं काम सुरु होतं. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

मिळालेल्या माहिती नुसार, सिलेंडरच्या स्फोटाने आग लागल्याचा अंदाज आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तर, संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालं आहे. आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.

पुण्यात एकाच वेळी लागली तीन ठिकाणी आग….

पहिली आग ही नेहरू रस्त्यावरील अप्सरा चित्रपटगृहाजवळ लागली होती. सायंकाळी याठिकाणी नाल्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

तर दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या रविवार पेठेतील तांबोळी मशिदीजवळ तारा माॅल येथे आग लागल्याची घटना घडली आहे.

रविवार पेठेतील तारा माॅल येथे सात मजली इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. छतावर ठेवलेल्या रिकाम्या प्लास्टिक टाकीला आग लागल्याचे जवानांच्या निदर्शनास आले.

तर तिसरी आग पुण्यातील हडपसर भागातील चिंतामणी नगर परिसरात एका गादी कारखान्यात आग लागली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे आणि जवानांनी आग आटोक्यात आणली.