पुणे – शहरात (pune) कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना पायी चालण्यासाठी चकचकीत फूटपाथ (Footpath) तयार करण्यात आले असून, आता या फूटपाथला (Footpath) अतिक्रमणांचा विळखा पडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर फूटपाथच्या (Footpath) जागेवर अनेकांनी हॉटेल थाटली आहेत, तर काहींनी हातगाड्या लावून तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी फूटपाथचा वापर सुरू केला आहे.

तर दुसरीकडे ‘चिरीमिरी’ची सवय लागलेले महापालिका अधिकारी मात्र हा प्रकार उघड्या डोळ्यांनी वर्षानुवर्षे पाहत आहेत. मात्र, आता फूटपाथवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे त्रस्त नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे शहरातील (pune) महत्वाच्या अश्या सिंहगड रोडलगतच्या (Sinhagad road) अनेक फूटपाथवर खाद्यपदार्थांच्या गाड्या, स्नॅक्स सेंटर्स, दुकानदार फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.

Advertisement

हे अतिक्रमण इतके हाताबाहेर गेले आहे, की नागरिकांना फुटपाथ तर दूरच मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

तर कार चालक आणि दुचाकीस्वार या फळ किंवा भाजी विक्रेत्यांसमोर रस्त्याच्या वरच बेकायदेशीरपणे गाड्या पार्क (Illegal parking) करतात.

त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते आणि ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शहरातील अनेक भागांमध्ये सध्या ही परिस्थिती दिसून येते आहे.

Advertisement

सिंहगड रस्त्यालगत, (Sinhagad road) विशेषत: आनंदनगर आणि वडगाव पुलाजवळील फूटपाथवरून (Footpath) वावरणे खरोखरच खूप अवघड आहे.

भाजी विक्रेते आणि स्नॅक्स सेंटर्स वाले फूटपाथ व्यापतात. आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

आनंदनगर आणि विठ्ठलवाडी येथील फूटपाथचा वापर वाहनधारक रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहने चालवण्यासाठी करतात.

Advertisement

तर दुसरीकडे पु. ल. देशपांडे गार्डनसमोरील नवश्या मारुती मंदिराजवळ फळ विक्रेते, भाजीपाला फेरीवाले, गॅरेजमालक आणि भोजनालय चालकांनी हे सर्व फूटपाथ ताब्यात घेतले आहेत.

दत्तवाडी वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, “की अनेक ठिकाणी फूटपाथच रस्त्यावरून गायब झाले असून, लोकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. तसेच त्यांची देखभालही केली जात नाही, असं ते म्हणाले.

तसेच, पुणे महानगरपालिकेने फूटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करणे आवश्यक आहे. आम्ही नियमितपणे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत आहोत. असं देखील यावेळी सांगितलं.

Advertisement