पुणे – गणेशोत्सव (rules for Ganeshotsav) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या उत्सवात शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव मंडळांकडून अनेक मोठे कार्यक्रम सादर करण्यात येतात. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (corona) विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच सण आणि कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आले आहे. मात्र, आता यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्या सर्वांच्या जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, यासाठी काही ठराविक नियमावाली नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

महापालिका, पोलीस प्रशासन तसेच शहरातील गणेशमंडळांची नुकतीच महापालिकेत बैठक पार पडली. महापालिकेने यावेळी गणेश मंडळांनी पाळावयाच्या (rules for Ganeshotsav) नियम, अटी याविषयी माहिती दिली.

यानुसार नियमावलीनुसार, स्वागत कमानींची उंची 18 फुटांहून अधिक असावी, मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा अधिक नसावी, अधिकृत परवान्यांची प्रत मंडपात दर्शनी भागात लावावी, असे विविध नियम घालून देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर मंडळांना मांडव, स्टेज, कमानी, रनिंग मंडपावर लावल्या जाणाऱ्या जाहिराती याविषयी नियम आणि अटी दिल्या आहेत.

मात्र जाहिरात हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असल्याचा दावा गणेश मंडळांनी केला आहे. त्यामुळे यंदा रनिंग मांडवावर बंधने नकोत, अशी मागणी मंडळांनी केली आहे. त्यासोबतच इतर काही मागण्यादेखील मंडळांनी केल्या आहेत.

काय आहे गणेशोत्सवासाठी नियमावली –

1. स्वागत कमानींची उंची 18 फुटांहून अधिक असावी,

2. मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा अधिक नसावी,

3. अधिकृत परवान्यांची प्रत मंडपात दर्शनी भागात लावावी

4. मंडळांना करोना प्रतिबंधक नियमांचे पालन आवश्यक राहील

5. गणेशोत्सव संपल्यानंतर संबंधित मंडळाने तीन दिवसांच्या आत मांडव,

6. देखाव्याचे बांधकाम, साहित्य हटवावे .इ. नियम गणेश मंडळांसाठी घालून देण्यात आले आहे.