पुणे – गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या एका दिवसावर आला आहे. या उत्सवात शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांकडून अनेक मोठे कार्यक्रम सादर करण्यात येतात. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (corona) विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच सण आणि कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आले आहे. मात्र, आता यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्या सर्वांच्या जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, सगळीकडे आनंद दिसून येत आहे.

नुकतीच, गणेशोत्सवाची नियमावलीही प्रशासनाकडून (Administration) जाहिर करण्यात आलीयं. त्यामुळे पुणे शहरातील गणेश मंडळे कामालाही लागली आहेत.

पुण्यातील गणेश उत्सव (Ganeshotsav) हा संपूर्ण जगात आकर्षणाचा विषय असतो, अनेक भारतीय आणि परदेशी नागरिक हा सोहळा अनुभवण्यासाठी पुण्यात येतात.

ढोल-ताशांच्या गजरात निघणारी गाणयाराची मिरवणूक असो वा.. जिवंत देखावे आणि सामाजिक उपक्रम असे विषय गणेश उत्सवादरम्यान पाहायला मिळतात.

दरम्यान, पुण्यात गणपती आगमनापूर्वीच विसर्जन मिरवणुकीवरून नवा वाद रंगाला आहे. मानाच्या पाच गणपतींच्या अगोदर आपल्याला मिरवणूक काढू द्यावी यासाठी पुण्यातील काही

गणेश मंडळामार्फत उच्च न्यायालयात याचिका (Bombay High Court) दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील मानाचे समजले (manache ganpati) जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती,

गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या सर्व मंडळांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणुकांच्या वेळी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच (manache ganpati) गणपती मंडळच जातील. त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही.

त्यामुळे इतर लहान गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीरता आणि संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे,

असा आरोप करणारी याचिका बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

याचिका मध्ये सांगण्यात आले की..,

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये शहरातील मानाच्या गणपती (manache ganpati) मंडळांनाच प्रशासन प्राधान्य देते. दरवर्षी विनंत्या करूनही पोलीस ऐकून घेत नाहीत तर

पहिल्या पाच मानाच्या गणपती (manache ganpati) मंडळांच्याद्वारे इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देण्यात येते अशी व्यथा याचिकेतून मांडल्याचे याचिकाकर्ते शैलेश बढाई यांनी म्हंटल.

तसेच आपल्याला अनेक लहान लहान गणपती मंडळांचा पाठींबा असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. त्यामुळे आता पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवरून नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.