पुणे – गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या उत्सवात शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांकडून अनेक मोठे कार्यक्रम सादर करण्यात येतात. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (corona) विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच सण आणि कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आले आहे. मात्र, आता यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्या सर्वांच्या जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, सगळीकडे आनंद दिसून येत आहे.

नुकतीच, गणेशोत्सवाची नियमावलीही प्रशासनाकडून (Administration) जाहिर करण्यात आलीयं. त्यामुळे पुणे शहरातील गणेश मंडळे कामालाही लागली आहेत.

पुण्यातील गणेश उत्सव (Ganeshotsav) हा संपूर्ण जगात आकर्षणाचा विषय असतो, अनेक भारतीय आणि परदेशी नागरिक हा सोहळा अनुभवण्यासाठी पुण्यात येतात.

ढोल-ताशांच्या गजरात निघणारी गाणयाराची मिरवणूक असो वा.. जिवंत देखावे आणि सामाजिक उपक्रम असे विषय गणेश उत्सवादरम्यान पाहायला मिळतात.

दरम्यान, असाच एक आगळा वेगळा देखावा यंदा पुण्यातील (Ganesh Mandal) नरेंद्र गणेश मंडळासमोर पाहवयास मिळणार आहे.

सामाजिक आणि राजकीय परस्थितीला अनुसरुन (Scenes) देखावे हे या मंडळाचे वैशिष्ट्ये राहिलेले आहे. मंडळाचे नाव नरेंद्र असले तरी यंदा या मंडळाने राज्यातील सत्तानाट्य गणरायासमोर उभा करण्याचे ठरवले आहे.

एवढेच नाहीतर देखावा तयार करायला सुरवातही झाली आहे. “सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन अन् कार्यकर्त्यांचे मरण’ शिंदे-ठाकरेंच्या सत्तासंघर्षाचे देखाव्यातून दर्शन होणार आहे.

हा देखावा मनोरंजक असला तरी कार्यकर्त्यांना आत्मपरिक्षण करायला लावणारा हे नकीच. अश्याच कल्पक आणि ज्वलंत विषयांवरील आकर्षक देखाव्यामुळे पुण्यातील गणेशोत्सव (Ganesh Mandal) हा सातासमुद्रा पार पोहोचला आहे.