पुणे – गणेशोत्सव (rules for Ganeshotsav) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या उत्सवात शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव मंडळांकडून अनेक मोठे कार्यक्रम सादर करण्यात येतात. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (corona) विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच सण आणि कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आले आहे. मात्र, आता यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्या सर्वांच्या जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, सगळीकडे आनंद दिसून येत आहे.

नुकतीच, गणेशोत्सवाची नियमावलीही प्रशासनाकडून (Administration) जाहिर करण्यात आलीयं. पुणे शहरातील गणेश मंडळे कामालाही लागली आहेत.

सध्या आॅनलाईन (Online) पध्दतीने गणेश मंडळांना नोंदणी करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलायंत. गणेशोत्सवात मंडळांकडून विविध प्रकारचे देखावे तयार केले जातात.

मात्र, यंदा गणेशोत्सवात ‘अफजल खानाच्या वधाचा’ देखावा नको, असे पुणे पोलिसांकडून (Pune Police) सांगण्यात आल्याने एकच गोंधळ निर्माण झालायं.

गणेशोत्सवात अफजल खानाच्या वधाचा देखावा केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, पुण्यातील एक गणेश मंडळ अफजल खानाच्या वधाचा देखावा करणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असून पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आम्ही देखावा करणारच असल्याचे गणेश मंडळाचे म्हणणे आहे.

संगम तरुण मंडळाने अफजल खानच्या वधाचा जिवंत देखावा सादर करण्यासाठी कोथरूड पोलिसांकडे परवानगी (Pune Police) मागितली होती.

दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी परवानगी या देखाव्यासाठी नाकारलीयं. मात्र परवानगी नाकारली तरी देखावा सादर करण्यावर मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे ठाम असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.