पुणे – गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या उत्सवात शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांकडून अनेक मोठे कार्यक्रम सादर करण्यात येतात. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (corona) विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच सण आणि कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आले आहे. मात्र, आता यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्या सर्वांच्या जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, सगळीकडे आनंद दिसून येत आहे.

पुण्यातील गणेश उत्सव (Ganeshotsav) हा संपूर्ण जगात आकर्षणाचा विषय असतो, अनेक भारतीय आणि परदेशी नागरिक हा सोहळा अनुभवण्यासाठी पुण्यात येतात.

ढोल-ताशांच्या गजरात निघणारी गाणयाराची मिरवणूक असो वा.. जिवंत देखावे आणि सामाजिक उपक्रम असे विषय गणेश उत्सवादरम्यान पाहायला मिळतात.

दरम्यान, आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले असून शहरातील बाजार पेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

पुणे शहरातील मुख्य बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी पुणेकरांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं,यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांशिवाय मोठ्या आनंदात पार पडणार आहे.

नुकतीच, गणेशोत्सवाची (Ganeshotsav) नियमावलीही प्रशासनाकडून (Administration) जाहिर करण्यात आलीयं. त्यामुळे पुणे शहरातील गणेश मंडळे कामालाही लागली आहेत.

एसटी प्रशासनदेखील झाल सज्ज….

गणेशोत्सवासाठी आता राज्यातले एसटी प्रशासनदेखील (ST Mahamandal) सज्ज झाल आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यातच कोकणातला गणेशोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी पुणे आणि मुंबईतून हजारो चाकरमानी हे कोकणात जात असतात.

त्यासाठी पुणे एसटी प्रशासनाने देखील मोठी तयारी केली आहे. गणेशोत्सवासाठी जवळपास 356 जादा बसेस सोडण्याचा निर्णय पुणे एसटी महामंडळाने घेतला आहे.

त्यातच आता जवळपास 70 टक्के तिकीट हे ऑनलाइन (Online ticket) पद्धतीने बुक झाली असल्याची माहिती देखील एसटी प्रशासनाने दिली आहे.