पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचा पुणे (Pune) दौरा चालू आहे. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना (Government officer) चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहे. तसेच त्यांनी शांती मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांना लोकांची चिंता नसून फक्त नेत्यांची चिंता लागून राहिलेली असते. असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी सरकारी अधिकाऱ्यांना टोला लगावला आहे.

नेत्यांप्रमाणे या अधिकाऱ्यांनी जनतेची काळजी केली असती तर हा समाज आज स्वर्गाप्रमाणे निर्माण झाला असता. आता जर क्रांतिवीर चाफेकर (Krantiveer Chafekar) असते तर या अधिकाऱ्यांची खैर नव्हती. असे देखील राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

Advertisement

तसेच त्यांनी मनातील एक खंत सुद्धा व्यक्त केली आहे. कोश्यारी म्हणाले की, माझे आणि विनय सहस्त्रबुद्धे यांचे एक सौभाग्य आहे. आम्हाला पंचतारांकित सोयीसुविधा मिळत (Five star facility) असतात.

पण शांती मिळत नाही. ती शांती फक्त निसर्गाच्या सानिध्यात आणि बांबूच्या झोपडीत मिळते, अशी खंत व्यक्त करत राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी राज्यपालांच्या खुर्चीने शांती भंग झाल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे.

देशासाठी ज्यांनी बलिदान देत जीवन समर्पित केले त्यांचे नाव मृत्यूनंतरही अजरामर आहे. अशा महान व्यक्तिमत्वांचा आदर्श समोर ठेवीत देशाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Advertisement

प्रत्येकाने उत्तमतेवर भर दिल्यास देशाची अधिक प्रगती होऊ शकेल. असे कोश्यारी यांनी पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchawad) प्राचीन भारतीय संस्कृती व्याख्यानमाला (Ancient Indian Culture Lecture Series) तसेच भारतीय वारसा परिचय आणि संवर्धन (Introduction and conservation of Indian heritage) या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलताना म्हणाले आहेत.