पुणे – पुणे शहराच्या (pune) मध्यवर्ती भागात असलेल्या कोरेगाव पार्क (koregaon park) परिसरात पोलिसांनी (pune police) मोठी कारवाई केली आहे. या भागात सुरु असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर (hookah parlors) कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे शहरात (pune police) गेल्या अनेक दिवसांपासून या कारवाई (Crime) सुरू करण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, या कारवाईअंर्गत पोलिसांनी हुक्का पार्लर चालकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी नरेंद्र अक्षयकुमार चौधरी (वय 20) शामल मनोरंजन देवनाथ (वय 31), कुमार अमर प्रधान (दोघे रा. रागविलास सोसायटी, नाॅर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क) यांच्या विराेधात गु्न्हा दाखल करण्यात आला.

मुंबईतील कमला मिल येथे झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने हुक्का पार्लरवर (hookah parlors) बंदी घातली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,

पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील गल्ली क्रमांक सात येथे डेझर्ट वाॅटर हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर (hookah parlors) सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळावी होती.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने डार्क हाॅर्स हाॅटेलमधील हुक्का पार्लर अचानक छापा मारत ही कारवाई केली आहे. पोलिसांनी हुक्का पार्लर चालक शामल देवनाथ, कुमार प्रधान यांच्या विरोधात गु्न्हा दाखल केला.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे, सावंत, संदीप जडर, विवेक जाधव, प्रवीण पडवळ, वर्षा ॲथोंनी आदींनी ही कारवाई केली.

दरम्यान, मागील आठवड्यात कोंढवा व विमाननगर परिसरात पोलिसांनी (pune police) बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर (hookah parlors) कारवाई करत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.

यावेळी पोलिसांनी 2 लाख 85 हजार रुपयांचे सांऊड सिस्टीम, 3 मस्कियूटर्स जप्त केले. तर विमाननगर येथेही एका हॉटेलमधून मोठ्या आवाजात सुरु असलेले 2 लाख 34 हजार रुपयांचे सांऊड सिस्टीम असा एकूण 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.