पुणे – पुणे शहराच्या (pune) मध्यवर्ती भागात असलेल्या कोंढवा व विमाननगर परिसरात पोलिसांनी (pune police) मोठी कारवाई केली आहे. या भागात बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर (hookah parlors) कारवाई करत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे शहरात (pune police) गेल्या दोन आठवड्या पासून या कारवाई (Crime) सुरू करण्यात आलेल्या आहेत. कोंढवा व विमाननगर परिसरात मोठ्या आवाजत सांऊड सिस्टीम सुरु असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

त्यानुसार पुणे पोलिसांच्या (pune police) सामाजिक सुरक्ष विभागाने मंगळवारी (दि.15) अचानकल छापा टाकताच येथे बेकायदेशीर हुक्का पार्लर (hookah parlors) असल्याचे समोर आले. तसेत तेथे मोठ्या आवाजात संगित सुरु होते. सिल्वर स्पून असं या हॉटेलच नाव आहे.

या कारवाई अंतर्गत पोलिंसांनी तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.यावेळी पोलिसांनी 2 लाख 85 हजार रुपयांचे सांऊड सिस्टीम, 3 मस्कियूटर्स जप्त केले.

तर विमाननगर येथेही एका हॉटेलमधून मोठ्या आवाजात सुरु असलेले 2 लाख 34 हजार रुपयांचे सांऊड सिस्टीम असा एकूण 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमाल कोंढवा व विमान नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही करवाई सामाजीक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अमंलदार राजेंद्र कुमावत,

बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, हणमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे, पुष्णेंद्र चव्हाण या पथकाने केली. सध्या पोलीस अधिकारी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

शहरात (Pune) रात्री उशिरापर्यंत व विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरच असलेल्या हाॅटेल्स, बार यांना प्रथम वेळेत बंद करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या.

जर वेळेत बंद होत नसल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुण्यात नाईट आऊट करणाऱ्यांवर पोलिसांची (pune police) करडी नजर असणार आहे.