पुणे – पुणे शहरातील (Pune) मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेला (Pune hotel fire) काल सकाळी अचानक लागलेल्या आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या एका ६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला (Girl Died) आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील (Sadashiv peth) भिकारदास मारुती जवळ एका हॉटलमध्ये ही घटना घडली आहे. मात्र, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इकरा नईम खान (सहा वर्षे) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती जवळील एका हॉटेलमध्ये सकाळी पावणे अकराच्या सुमारास आग लागली.

आग लागल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी अग्निशामक दलास दिली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक महिला आणि तीन मुलं असल्याची माहिती जवानांना मिळाली.

महिला आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. हॉटेलच्या पोटमाळ्यावर अडकलेल्या मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, गंभीर जखमी झालेल्या मुलीला जवानांनी बाहेर काढले.

त्यानंतर तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी मुलीचा मृत्यू झाला. मात्र, ही भीषण आग नेमकी कशा मुळे लागली हे समजू शकले नाही.

हॉटेल आगीत भस्मसात झाल्याने हॉटेलचे नाव समजू शकले नाही. ही घटना शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाने घटनास्थळावरील तीन सिलेंडर बाहेर काढले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे.

आगीची घटना घडल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी दोन मुलांना तातडीने उचलून हॉटेल बाहेर आणले. त्यानंतर मुलीला आणण्यासाठी ते जात असताना आगीने रौद्र रूप धारण केले, त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये जाणे शक्य झाले नाही. आणि ती मुलगी आतमध्येच अडकली होती.