पुणे : मागील काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे (Corona) बांधकाम व्यावसायिकांना (Builders) चांगलाच फटका बसला आहे. तसेच कोरोनाचा परिणाम (Corona Effect) हा बांधकामासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूवर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) मुख्य भागात घरांच्या किमती (House prices) कोटीच्या आसपास गेल्याची माहिती होती. बांधकामासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू महागल्या मुळे हे परिणाम पाहायला मिळत आहेत.

तसेच आता मेट्रो सुविधांमुळे (Metro facility) घरांच्या आणखी किमती वाढल्या आहेत. महामेट्रोच प्रकल्प पूर्ण होत असल्याने वाहतुकीचे जाळे वेगाने विस्तारात आहे. सद्यस्थितीला ज्या भागात मेट्रोचे जाळे तयार होते आहे, त्या परिसरतील घराच्या किंमती वेगाने वाढत आहेत.

Advertisement

ज्या भागातून मेट्रो गेली आहे त्या भागातील आणि परिसरातील घरांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दळणवळणाच्या सुविधांमुळे घरांच्या किमती वाढत आहेत.

कोणत्या भागात घरांचे किती दर…

१. एरंडवणे- 11 ते 13 हजार चौरस फूट

Advertisement

२. कोथरूड – 8 ते 15हजार चौरस फूट

३. वारजे- 5 ते 7 हजार चौरस फूट

४. पेठ परिसर- 11 ते 12हजार चौरस फूट

Advertisement

५. डेक्कन 14 ते 16 हजार चौरस फूट

६. प्रभात रोड – 14 ते 16 हजार चौरस फूट

७. पाषाण 6 ते 8 हजार चौरस फूट

Advertisement

८. बावधन-6 ते 10 हजार चौरस फूट

९. भोसलेनगर – 12 ते 15 हजार चौरस फूट

१०. कर्वेनगर 7 ते 13 हजार चौरस फूट

Advertisement

११. औंध- 7 ते 10 हजार चौरस फूट

१२. बाणेर-7 ते 10 हजार चौरस फूट

Advertisement