Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

काळ्या बुरशीच्या बाबतीतही पुणे राज्यात दुसरा

पुणे : कोरोनाच्या संख्येत जसा पुणे देशात आघाडीवर होता, तसाच तो आता काळ्या बुरशीच्या रुग्णांबाबतही आहे. पुण्यात काळ्या बुरशीचे १२१७ रुग्ण आढळले आहेत.

आठ हजारांहून अधिक रुग्ण

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 22 जूनपर्यंत पहिल्या क्रमांकावर नागपूर, दुसरे पुणे, तिसरे औरंगाबाद, चौथे मुंबई आणि पाचव्या क्रमांकावर नाशिक जिल्हा आहे.

नागपूरमध्ये एक हजार 307, पुण्यात एक हजार 217, औरंगाबादमध्ये 945, मुंबई आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 529 रुग्ण आढळून आलेले आहेत.

रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत प्रत्येकी 11, वाशिम, भंडारा व हिंगोली जिल्ह्यांत प्रत्येकी 16 रुग्ण आहेत. राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून आठ हजार 184 रुग्ण आढळून आले आहेत.

त्यापैकी दोन हजार 884 रुग्ण बरे झाले आहेत. 734 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू दर 9.33 टक्क्यांवर

म्युकर मायकोसिसचा मृत्यू दर 40 टक्क्यांच्या पुढे असतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे; मात्र रुग्णांचे तातडीने निदान झाल्याने आणि उपचार मिळाल्याने त्यांचा मृत्यू दर दहा टक्क्यांच्या आत राहण्यास मदत झाली आहे.

राज्यात आठ हजार 184 रुग्णांपैकी 734 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नागपूर सर्वाधिक 104, पुणे 93, औरंगाबाद 80, मुंबई 50, नाशिक 53 आणि सोलापूर 52 अशी संख्या आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मृतांची संख्या चाळीसच्या आत आहे.

53 टक्के रुग्णांवर उपचार सुरू

राज्यातील आठ हजार 184 रुग्णांपैकी चार हजार 407 म्हणजेच 53 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नागपुरातील 566, पुणे 882, औरंगाबाद 395, मुंबई 420, नाशिक 242, सोलापूर 154 व इतर सर्व जिल्ह्यांमध्ये दीडशेपेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a comment