पुणे – पुण्यातील लोकल ( pune-lonavala local) रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वेने पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलसेवेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना थोडा त्रास सहन करावाला लागणार आहे. पुणे-लोणावळा ( pune-lonavala local) दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या दोन फेऱ्या शुक्रवारी (4 नोव्हेंबर) रद्द करण्यात येणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी 9.55 वाजता लोणावळ्यासाठी सुटणारी लोकल शुक्रवारी धावणार नाही. असं रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.

लोहमार्गावरील तांत्रिक कामांमुळे रेल्वेच्या वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याचे पुणे रेल्वेकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुणे – लोणावळा रेल्वे ( pune-lonavala local) प्रवाशांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

तसेच दुपारी 2.50 वाजता लोणावळा स्थानकातून पुण्यासाठी सोडण्यात येणारी लोकल रद्द करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा विभागात काही तांत्रिक कामे करण्यात येणार असल्याने लोकलच्या या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

या दोन लोकल वगळता पुणे ते लोणावळा दरम्यान सकाळी आणि दुपारी सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या नियमित सुरू असतील. प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पुणे रेल्वेकडून करण्यात आले आहे.

पुण्याहून 20 एक्सप्रेस गाड्या सुटतात…

दररोज सुमारे 40,000 ते 50,000 लोक ये-जा करतात. अधिक गाड्या ही प्रवाशांची गरज आहे आणि आमचा रोजचा त्रास कमी होईल, असं मत एका प्रवाशाने व्यक्त केलं आहे.

काही गाड्या वगळता एक्स्प्रेस गाड्यांमध्ये बेडची सुविधा दिली जात आहे. पुण्याहून 20 एक्सप्रेस गाड्या सुटतात. यापैकी 13 गाड्यांमध्ये सध्या बेडची सुविधा उपलब्ध आहे. आणखी सात गाड्यांमध्ये बेडची सेवा उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. असं देखील प्रवासी संगणतात.