पुणे – पुण्यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्च महिन्यात सुरु झाली असून, आता पर्यंत मेट्रोला पुणेकरांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मेट्रो पुणेकरांना (Pune Metro) घेऊन धावत आहे. पुण्यातील (pune) प्रवाश्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या मेट्रोतून (Pune Metro) लाखो लोक दररोज प्रवास करत आहेत. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर होणार ताण कमी झाला असून, मेट्रोच्या (Metro) रखडलेल्या पुढील कामाला आता सुरुवात झाली आहे.

दरम्यान, पुण्यात मेट्रो कारशेडचे (Pune Metro Car Shed) काम सुरु असतानाच एक दुदैवी घटना आहे. मेट्रो कारशेटचे काम सुरु असतानाच अपघातात कामगाराला प्राण गमवावे लागले.

50 फूट उंचीवरुन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवार 15 मे रात्री उशिरा घडली. पुणे शहरात पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ ही दुर्दैवी अपघात झाला.

Advertisement

मूलचंद्र कुमार सीताराम असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तो मूळ उत्तर प्रदेश येथील राहणारा होता. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

मूलचंद्र कुमार हा मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता. कामाच्या निमित्ताने तो पुण्यात आला होता. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कामगाराने सुरक्षाविषयक साहित्य घातले होते, मात्र 50 फूट इतक्या उंचीवरुन खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.

Advertisement

त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच मूलचंद्र कुमार याचा मृत्यू झाला.