पुणे : महानगरपालिकेच्या (Municipal) सभेत मेट्रोच्या कामावरून (Metro Work) सत्ताधारी आणि विरोधक (Ruling party and opposition) यांच्यामुळे गदारोळ झालेला नुकताच पाहायला मिळाला आहे.

गदारोळामुळे महापालिकेची सभा तहकूब करावी लागली होती. संभाजी पुलावरून (Sambhaji Bridge) म्हणजेच लकडी पुलावरून जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गामुळे (Metro Route) महापालिकेत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली होती.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे. पुणे मेट्रोचे काम थांबवणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही.

Advertisement

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनीच पुणे मेट्रोचा डीपीआर (Metro DPR) चुकवला आहे.

१३१ वर्षाची परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीची (Ganesha immersion procession) वैभवशाली परंपरा खंडित होणार आहे.

याला तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

Advertisement

महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी सप्टेंबर महिन्यात कोणत्या अधिकारात संभाजी पुलावरील (Sambhaji Bridge) काम थांबवले याचे उताराही त्यांनी द्यावे असे आव्हानही प्रशांत जगताप यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण ?

हा मेट्रो मार्ग वनाज ते रामवाडी, डेक्कन जिमखाना येथून नदीपात्रातून जात आहे. संभाजी पुलावरून या मार्गीकेचे गर्डर टाकले जाणार आहेत. याची उंची कमी असल्यामुळे गणपती मिरवणुकींना अडचणी निर्माण होणार आहे.

Advertisement

हे सर्व पाहता गणेश मंडळांनी (Ganesh Mandal) त्याला विरोध केला आहे. ३ म्हन्यांपासून मेट्रोचे कामकाज ठप्प आहे.

या ३ महिन्यांच्या कालावधीत गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मेट्रो व महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तीन बैठका झाल्या.

त्यामध्ये विविध पर्यायांची चर्चा झाली. मात्र, त्यासाठी किमान दोन वर्ष जातील, असे स्पष्ट झाल्यानंतर हे काम सुरू करण्याचे अजित पवार यांनी आदेश दिले आहेत.

Advertisement

महापालिकेची सभा सुरु झाल्यावर विरोधकांनी महापौरांच्या आसनापुढे समोर येत जोरदार घोषणाबाजी केली. परंतु महापौरांनी यावर चर्चा करून काहीच साध्य होणार नसल्याचे सांगत ही मागणी फेटाळली आहे.