पुणे : मेट्रोचे (Metro) काम जोरदार सुरु आहे पण मेट्रोच्या कंत्राटदार कंपनीकडून (Contractor Company) हलगर्जी पणा करण्यात आला आहे. यामुळे एका दुचाकीस्वाराचा अंगावर लाकडाचे तुकडे पडले.

यामुळे दुचाकीस्वार जखमी (Injured) झाला आहे. मेट्रो स्टेशन चे काम सुरु असताना हे घटना घडली आहे. नाशिक फाटा मेट्रो स्टेशन (Nashik FATA Metro Station) येथे ही घटना घडली आहे.

या प्रकरणी मेट्रो स्टेशनचे (Metro station) बांधकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराच्या जबाबदार व्यक्तींवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

अमोल फकिरा कदम (Amol Faqira Kadam) (वय ४०, रा. शिरगाव, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात (Bhosari police station) तक्रार दाखल केली आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात नाशिक फाटा (Nashik Fata) येथे स्टेशनचे काम सुरू आहे.

अमोल कदम आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून नाशिक फाटा रस्त्याने जात असताना मेट्रो स्टेशनच्या कामावरून पडलेला लाकडाचा तुकडा त्यांच्या डोक्यावर पडला.

Advertisement

अमोल यांनी हेल्मेट घातले असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याबाबत मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे (Assistant Inspector of Police Kalyan Ghadge) ​तपास करत आहेत

Advertisement