पुणे – पुणे शहरातील मेट्रोच्या (Pune Metro) कामाला गती देऊन गरवारे महाविद्यालय (garware college) ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रोमार्गाचे काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहे. यावेळी महामेट्रोचे (Pune Metro) व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.

पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, मार्च अखेरपर्यंत शहरात सुरू असलेल्या 33 किलोमीटरच्या मेट्रो (Pune Metro) लाईनचे काम पूर्ण होईल असे नियोजन करण्यात यावे. महामेट्रोला (Pune Metro) कामाची गती वाढविण्यासाठी शासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल.

दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प (Pune Metro) अहवालाला शासनाची मंजूरी मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी (Chandrakant Patil) सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचाही आढावा घेतला. यावेळी कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य ज्ञान अधिकारी दिनेश वीरकर,

मुख्य अभियंता अरुण गोडबोले, कंपनी सचिव स्वानंद शेडे उपस्थित होते. स्मार्ट सिटीचे प्रकल्प नागरिकांच्या जीवनशैलीत अधिक चांगले बदल होण्याच्यादृष्टीने उपयुक्त असून या थीमबेस्ड प्रकल्पांना अधिक गती द्यावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी कोलते यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. कॉर्पोरेशनच्या प्रकल्पांची सद्यस्थिती, निधीची आवश्यकता आदींविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

राज्य शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक धनराज माने यांना दिसत नसल्याने त्यांना पदावरून कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती, याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, तीन डॉक्टरांच्या पॅनलने धनराज माने यांच्या दृष्टीची तपासणी केली आहे.

त्यानुसार त्यांना दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी मुंबई विद्यापीठाचे रजिस्टर देवळणकर यांना कार्यभार सोपवण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सदर पदाची नियुक्ती करण्यासंदर्भात सुचवण्यात आले असून सदर जागी नवीन अधिकारी नेमणूक होईपर्यंत याबाबतचा कार्यभार देवळाणकर यांच्याकडे राहणार आहे.