पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेली मेट्रो पुणेकरांना (Pune Metro) घेऊन धावत आहे. पुण्यातील (pune) प्रवाश्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या मेट्रोतून (Pune Metro) लाखो लोक दररोज प्रवास करत आहेत. पुणे शहरातील पायाभूत सुविधांवर होणार ताण कमी करणारी पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्च महिन्यात सुरु झाली असून, मेट्रोला पुणेकरांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यात वनाझ ते गरवारे कॉलेज (4.91 किमी) आणि पिंपरी ते फुगेवाडी (7.03 किमी) असे दोन प्राधान्य मार्ग सुरू करण्यात आले आहे.

तसेच, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतरावर 6 मार्च 2022 पासून मेट्रो धावत असून, आता डिसेंबर महिन्यात पिंपरी ते पुण्यातील सिव्हील कोर्ट या मार्गावर पुणे मेट्रो धावणार आहे.

त्यामुळे शहरातील नागरिकांना मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येईल. असं असले तरी पुणे मेट्रोने (Pune Metro) प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक महत्वाचे पाऊल उचले आहे.

पुणे मेट्रोचं तिकीट आता व्हॉट्सअपवर (Whatsapp) उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना याचा फायदा होणार आहे. पुणे मेट्रोने एक व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे.

त्या नंबरवर व्हॉट्सॲप केल्यावर प्रवाशांच्या मोबाईलवरच क्यूआर कोड येणार आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट मोबाईलवर मिळणार आहे. 9420101990 हा नंबर पुणे मेट्रोकडून प्रवाशांना देण्यात आला आहे.

पुणे मेट्रोच्या या सोयीमुळे प्रवाशांना रांगेत तात्काळत उभं राहण्याचा त्रास वाचणार आहे. पुणेकरांचा तिकीटांसाठीचा त्रास कमी होणार आहे. प्रवाशांना दोन पद्धतीने ई-तिकीट काढता येणार आहे.

पहिली पद्धत म्हणजे किऑस्क मशिनच्या साहाय्याने प्रवासी स्वतः हे तिकीट काढू शकतो. तर दुसरी पद्धत म्हणजे स्थानकात जाऊन टॉम ऑपरेटरशी संपर्क साधून आपल्याला ई-तिकीट मिळवता येईल.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या एकूण दहा स्थानकांवर डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येक स्टेशनवर तिकीट व्हेंडिंग मशीन (टीव्हीएम) बसवण्यात आले आहे.

यामध्ये क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट मिळणार आहे. ई-तिकीट पेपरलेस असल्याने पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे कचरादेखील कमी होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होणार आहे.