पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उदघाटन झालेली मेट्रो पुणेकरांना (Pune Metro) घेऊन धावत आहे. पुण्यातील (pune) प्रवाश्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या मेट्रोतून (Pune Metro) लाखो लोक दररोज प्रवास करत आहेत. पुणे शहरातील पायाभूत सुविधांवर होणार ताण कमी करणारी पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्च महिन्यात सुरु झाली असून, आता पर्यंत मेट्रोला पुणेकरांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यात वनाझ ते गरवारे कॉलेज (4.91 किमी) आणि पिंपरी ते फुगेवाडी (7.03 किमी) असे दोन प्राधान्य मार्ग सुरू करण्यात आले आहे. तसेच, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतरावर 6 मार्च 2022 पासून मेट्रो धावत आहे.

अश्यातच, आता पिंपरी (Pimpri) ते पुण्यातील सिव्हील कोर्ट या मार्गावर (Pimpri to civil court metro) पुणे मेट्रो डिसेंबर महिन्यात धावणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येईल.

असं असले तरी पुणे मेट्रोने (Pune Metro) प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक महत्वाचे पाऊल उचले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या एकूण दहा स्थानकांवर आता डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार आहे.

यामध्ये प्रत्येक स्टेशनवर तिकीट व्हेंडिंग मशीन (टीव्हीएम) बसवण्यात आले आहे. यामध्ये क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे आता प्रवाशांना प्रत्यक्षात तिकीट काढण्याकरिता तिकीट काउंटरला न जाता सुलभ प्रवास करता येणार आहे, अशी माहिती पुणे महामेट्रोचे अतुल गाडगीळ यांनी दिली. पुण्यात पुणे मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत.

सध्या गरवारे ते कोथरूड डेपो आणि पिंपरी ते फुगेवाडी स्थानकादरम्यान मेट्रो धावत आहे. लवकरच पिंपरी ते शिवाजीनगर कोर्टदरम्यान ही सेवा सुरू केली जाणार आहे.

सध्या शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाचे (Pune Metro) काम हे अंतिम टप्प्यात आले असून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी हे स्थानक कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मेट्रो स्थानकावरील प्रवाशांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मेट्रो प्रशासनाने हायटेक तंत्रज्ञान स्वीकारले आहे. तिकीट काउंटरवरील वेळ वाचवण्यासाठी 10 स्थानकांवर अत्याधुनिक व्हेंडिंग मशीन ठेवण्यात येणार असून,

क्यूआर कोडच्या माध्यमातून रांगेत न लागता प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. यासोबतच पुणे मेट्रोच्या मोबाइल अॅपवरूनही थेट इच्छित स्थळी जाण्याचे तिकीट प्रवाशांना काढता येणार असल्याची माहिती गाडगीळ यांनी दिली.