पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उदघाटन झालेली मेट्रो पुणेकरांना (Pune Metro) घेऊन धावत आहे. पुण्यातील (pune) प्रवाश्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या मेट्रोतून (Pune Metro) लाखो लोक दररोज प्रवास करत आहेत. पुणे शहरातील पायाभूत सुविधांवर होणार ताण कमी करणारी पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्च महिन्यात सुरु झाली असून, आता पर्यंत मेट्रोला पुणेकरांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यात वनाझ ते गरवारे कॉलेज (4.91 किमी) आणि पिंपरी ते फुगेवाडी (7.03 किमी) असे दोन प्राधान्य मार्ग सुरू करण्यात आले आहे.

अश्यातच, आता शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून मेट्रोसाटी 112 खांबांची उभारणी झाल्यानंतर खांब गर्डरने जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाला देण्यात आले आहे.

त्यासाटी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्वतंत्र हेतू उद्देश कंपनीची स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापना करण्यात आलेली आहे.ही मार्गिका एकूण 23.3 किलोमीटर अंतराची आहे.

या मार्गावर सध्या विविध ठिकाणी गर्डर काम हाती घेण्यात आलेले आहे. या प्रत्येक गर्डरची लांबी सुमारे 70.5 मीटर आहे. प्रकल्पासाठी अशा एकूण आठ गर्डरची बांधणी केली जाणार आहे.

मेट्रो धावणार खडकवासला ते खराडी….

मात्र, काही दिवसांपूर्वी पुणे महामेट्रोकडून (Pune Metro) खडकवासला ते खराडी या 25 किलोमीटर अंतराचा मेट्रोचा प्रारूप प्रकल्प आराखडा महापालिकेस सादर केला आहे.

या मार्गासाठी सुमारे 8 हजार 565 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली खडकवासला ते स्वारगेट- हडपसर आणि खराडी असा हा स्वतंत्र मार्ग असणार असून या मार्गावर 22 स्थानके असणार आहेत.