पुणे : महापालिकेने (Municipal Corporation) शहरात पादचारी रस्त्यावर (Pedestrian roads) गाड्या (cars) लावणाऱ्या वाहनचालकांना इशारा दिला आहे. पादचारी रस्त्यावरून गाडी हलवण्याचे आव्हान महापालिकेकडून करण्यात आले आहे.

७ दिवसात गाडी पादचारी रस्त्यावरून हलवली नाही तर ठिक नाही तर आरटीओची नोंदणी (RTO Registration) रद्द करू या गाड्या लिलाव (Auctio) करण्यासाठी उचलल्या जाणार आहेत.

असा इशारा (Gesture) महापालिकेने रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करणाऱ्या वाहनधारकांना दिला आहे. रस्त्याच्या कडेला महिनोंमहिने चारचाकी, दुचाकी लावलेल्या असतात.

Advertisement

धुळीने माखलेल्या, घाण झालेल्या गाड्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांचा मालक तयार नसतो. अशा गाड्यांमुळे महापालिकेला (pune municipal corporation) रस्ते झाडताना, दुरुस्ती करताना अडथळा होत आहे.

त्यामुळे महापालिकेने वाहनधारकांना (Vehicle owner) थेट इशारा दिला आहे. शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये चारचाकी गाड्यांसाठी पार्किंग (Parking) नाही, वस्त्यांमध्ये देखील चारचाकी लावण्यासाठी जागा नसते.

पार्किंगची सोय नसल्यामुळे वाहनधारक पादचारी रस्त्यावर गाड्या लावतात. काही महिने ते काही वर्ष गाड्या एकाच जागी असतात. त्यामुळे महापालिका आता गाड्या हलवल्या नाहीत तर कारवाई करणार आहे.

Advertisement