पुणे – पुण्याहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे-मुंबई (Pune-Mumbai) दरम्यान दैनंदिन धावणाऱ्या सर्वच महत्त्वाच्या रेल्वे (Train) रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (chhatrapati shivaji maharaj terminus) ते मशीद रोड स्थानकादरम्यानचा १५४ वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी रेल्वे (trains) प्रशासनाने तब्बल २७ तासांचा मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर केला आहे.

त्यामुळे काल शनिवार (१९ नोव्हेंबर) ते सोमवार (२१ नोव्हेंबर) पुण्याहून (Pune) मुंबईकडे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये १५ गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे (Train) प्रशासनाने पुणे स्थानकावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात घेण्यात येणाऱ्या ‘ब्लॉक’मुळे तीन दिवस मध्य रेल्वेच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी २४ तास हेल्प डेस्कही सुरू करण्यात आला आहे.

प्रवाशांना गरज भासल्यास पुणे स्थानकातून (Pune-Mumbai) जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. सध्या अनेक प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या नियोजनात बदल केल्याचं पाहायला मिळत आहे.

१९ व २० नोव्हेंबर रोजी मुंबईला येणाऱ्या रेल्वे रद्द केल्या आहेत. यात पुणे (Train) स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वेचा देखील समावेश आहे. तर काही रेल्वे मुंबईला न जाता पुण्यापर्यंत धावणार आहे.

प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी २४ तास सुरु राहणारे हेल्पडेस्क देखील सुरु केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे स्थानकांदरम्यानचा कर्नाक उड्डाणपूल हा ब्रिटिशांनी १८६८ साली बांधला होता. हा उड्डाणपूल ५० मीटर लांब आणि १८ मीटर रुंद आहे. त्याला तडे गेले असून या पूलाचा पायाही खराब झाला आहे.

यामुळे भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी हा पूल २२ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर २ सप्टेंबरपासून रेल्वे हद्दीतील किरकोळ पाडकामाला सुरुवात करण्यात आली. आता हा संपूर्ण पूल पाडण्यात जाणार आहे.

जाऊन घ्या, २० नोव्हेंबरला पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या :

मुंबई-बंगळुरु उद्यान एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस, मुंबई-गदग एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस.