पुणे : महापालिकेला (Pune Muncipal Corporation) यंदा नऊ महिन्यांमध्येच वर्षाचे उत्पन्न (Annual income) ​मिळाले आहे. महापालिकेच्या प्रयत्नामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे महापालिकेला चांगलेच उत्पन्न मिळाले आहे.

महापालिकेला पाठीमागच्या वर्षी ज्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागला होता ते यंदा महापालिकेने ९ महिन्यातच केले आहे. ४ हजार ६०० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला (Municipal Corporation of Income) ९ महिन्यातच मिळाले आहे.

या वर्षीचे आणखी ३ महिने शिल्लक असल्यामुळे महापालिकेला आणखी उत्पन्न होणार आहे. या दोन महिन्यात दोन हजार कोटीचे उत्पन्न मिळेल असा दावा महापालिकेने केला आहे.

Advertisement

महापालिकेच्या महसुल समितीची आढावा बैठक (Revenue Committee Meeting) आज (सोमवारी) झाली. याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Information Standing Committee Chairman Hemant Rasane) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२७ डिसेंबरपर्यंत महापालिकेला ४ हजार ६०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. २०१९- २० या संपूर्ण आर्थिक वर्षात एवढेच उत्पन्न मिळाले होते.

यंदा बांधकाम शुल्कातून १२०० कोटी, मिळकतकर विभागातून १२५३ कोटी, जीएसटीतून १६०० कोटी, पाणी पुरवठा ७५ कोटी हे प्रमुख उत्पन्न मिळाले आहे.

Advertisement

आगामी तीन महिन्यांत जीएसटी व मुद्रांक शुल्कापोटी शासनाकडून ७०० कोटी रुपये, बांधकाम विभागाकडून ३०० कोटी, मिळकतकर विभागाकडून ७०० कोटी रुपये मिळाले आहेत.

पथ विभागाकडून खोदाई शुल्क व दंडापोटी ५०० कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आणखी दोन हजार कोटींची भर महापालिकेच्या तिजोरीत पडू शकते असा दावा हेमंत रासने यांनी केला

Advertisement