पुणे : येत्या काही दिवसात पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक (Pune Municipal Corporation Election) होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार केला आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा काही मोजक्याच जागांवर महापालिकेची निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. पक्षाच्या बैठकांनाही सुरवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष त्यांचे वर्चस्व असलेल्या जागांवरच निवडणूक (Election) लढवणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे. महानगपालिकेच्या निवडणुकीत १७३ जागांपैकी फक्त ४० जागांची निवडणूक लढवण्याचा विचार मनसे करत आहे.

Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्याचा दौरा केला आहे. हा दौरा आगामी निवडणुकीसाठी महत्वाचा मानला जात आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या.

महानगपालिकेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. यामध्ये सर्व जागा न लढवता काही जागा लढवण्याचा विचार करण्यात आला आहे.

पक्षाचे नेते अनिल शिदोरे, वसंत मोरे, किशोर शिंदे, बाबू वासस्कर, गणेश सातपुते, बाळा शेडगे, साईनाथ बाबर, योगेश खैरे, रणजित शिरोळे, संतोष पाटील आणि वनिता वागस्कर यावेळी बैठकीला उपस्थित होते.

Advertisement