पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीकोनातून २५ तारखेला पुणे (Pune) दौऱ्यावर येण्याचे संकेत आहेत. हा दौरा महापालिकेची निवडणूक (Municipal elections) हेतूने महत्वाचा ठरणार आहे.

या निवडणुकीत सर्वच जागा लढवण्याची तयारी मनसेने (MNS)केली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात काही दिवसांपूर्वी मुंबईमध्येही (Mumbai) मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठका झाल्या होत्या. त्याप्रमाणे मनसेने सर्व तयारी केली आहे.

प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातीला पक्षाचे नेते, कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झाले आहेत. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एका महापालिका निवडणुकांवर आपले लक्ष केंद्रित केलं आहे.

Advertisement

निवडणुकीची तयारी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात मनसे निरीक्षक नेमल्याची माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे याच दौरा महत्त्व ठरणार आहे.

यापूर्वी १५ डिसेंबरला राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा करत कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यांच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यामुळे यावेळीचे भेट ही कार्यकर्त्यांसाठी निश्चितच निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा दौरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी निश्चितच महत्त्वपूर्व ठरणार आहे.

Advertisement