पुणे : महापालिकेने (Municipal Corporation) विद्यार्थ्यांच्या (Students) हिताचा मोठा निर्णय घेतला आहे.
महापलिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांच्या (Department of Education School) इयत्ता १० आणि १२ च्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण मंडळाकडील शुल्क (Fees) महापालिका भरणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या (Standing Committee) बैठकीत मंगळवारी या तरतुदीस मान्यता मिळाली आहे.
समिती अध्यक्ष हेमंत रासने (Committee Chairman Hemant Rasane) यांनी ही माहिती दिली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागातील ४४ शाळांमधून ४ हजार ३९२ परीक्षेला बसणार आहेत.
प्रति विद्यार्थी ४१५ रुपये आणि तंत्रशाळेतील २०० विद्यार्थ्यांचे प्रति ५२५ रुपये परीक्षा फी भरण्यात येणार आहे. बारावीतील ४४९ विद्यार्थ्यांचे वाणिज्य शाखा प्रति ४३० रुपये आणि विज्ञान शाखेसाठी ४९० रुपये परीक्षा शुल्क भरण्यात येणार आहे.
दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला आहे. मार्च एप्रिल मध्ये होणारे पेपर ११ ऐवजी साडेदहा वाजता सुरु होणार आहेत.