पुणे : राज्यभरात महावितरणाकडून (MSEDCL) वीजबील वसुली सुरु आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबील (Electricity bill) वसुली महावितरणाकडून करण्यात येत आहे. अशातच महापालिकेकच्या (Pune Municipal Corporation) वीज बिलासाठी पाऊल उचलण्यात येणार आहे.

महापालिकेने महावितरणकडून वीज विकत न घेता खुल्या बाजारातून (Open Access) वीज खरेदी केली तर महापालिकेचे वर्षाला १२ कोटी रुपयांचे बिल कमी होणार आहे.

महापालिकेकडून एनर्जी एफिशियन्सी सर्विस लिमिटेडची (EESL) उपकंपनी असलेल्या कव्हर्जन एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (CESL) या शासकीय संस्थेसोबत वीज खरेदीचा २० वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे.

Advertisement

यामुळे महापालिकेला पाणी पुरवठ्याच्या वीज बिलात प्रतियुनिट किमान ७६ पैशांचा फायदा होणार आहे. महापालिकेच्या शहरातील मिळकती, पाणी पुरवठा प्रकल्प, मैला शुद्धीकरण प्रकल्प, उद्याने, पथदिवे यांसह अनेक ठिकाणी वीज मीटर आहेत.

यासाठी चालू आर्थिक वर्षात २९३ कोटींच्या वीज बिलासाठी खर्चाची तरतूद आहे. यामध्ये पाणी पुरवठा प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपयांचा खर्च आहे.

विद्युत विभागाने एनईआरसीच्या नियमानुसार एक मेगा व्हॅटपेक्षा जास्त वीज वापर असलेल्या वीज ग्राहकांची यादी तयार केली आहे.

Advertisement

या यादीनुसार विद्युत विभागास (Electrical department) ​सर्व पाणीपुरवठा विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र व उपसा केंद्रासाठी दर वर्षाला १५ कोटी ४२ लाख ६५ हजार ४०० किलोव्हॅट वीज वापर होत आहे.

यासाठी ओपन ऍक्सेस मधून वीज घेतल्यास महापालिकेचे आताच्या दरापेक्षा ७६ पैसे प्रति युनिट बचत होणार आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला १ कोटी रुपये वाचणार आहेत.

प्रत्येक महिन्याला १ कोटी रुपये वाचले तर वर्षाला १२ कोटी रुपये महापालिकेचे वाचणार आहेत. त्यामुळे महापालिकेला याचा फायदा होणार आहे.

Advertisement