पुणे : शहरात आणि जिल्ह्यात (District) गुन्हेगारीचे (crime) प्रमाण अधिकच गडद होत चालले आहे. प्रशासनाने यासाठी काहीतरी ठोस पाऊले उचलणे अत्यंत महत्वाचे आहे. नुकतीच अकरावीतील विद्यार्थ्यांची (student) त्याच्या चुलत सख्या भावाकडून हत्या करण्यात आली आहे.

त्यातच आता भर चौकात (Square) गोळ्या घालून पैलवानाची हत्या करण्यात आली आहे. खेड (Khed) तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या वेळी हा खून झाला आहे.

ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरामध्ये कैद झाली आहे. चाकण पोलीस ठाणे (Chakan Police Thane) हद्दीतील शेलपिंपळगाव (Shelpimpalgaon) येथे एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

Advertisement

नागेश सुभाष कराळे (Nagesh Subhash Karale) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तीन आरोपींनी चारचाकी वाहनांमधून येत नागेश कराळे यांच्यावर पिस्तुलातून (pistol) पाच ते सहा गोळ्या झाडून त्यांचा खून केला आहे.

जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी (Chakan police) लावला आहे. मात्र ही हत्या कोणी केली, आणि त्यामागील कारण काय, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

आरोपींनी पिस्तूलमधून एकापाठोपाठ चार ते पाच राऊंड फायर केले. या गोळीबारात कराळे यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.

Advertisement

पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchavad) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतच हे प्रमाण अधिक असल्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) यांच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत.