file photo

पुणे : शहरातील लोणीकंद (Lonikand) येथे एक धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. २२ वर्षीय तरुणासह त्याच्या वडिलांचा दगडाने ठेचून खून (Murder) करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पुणे शहरात (Pune City) गुन्हेगारीचे प्रमाण (Crime Rate) दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचादेखील समावेश असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अगोदरच खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा (Punishment for murder) भोगत असताना जामिनावर (Bail) सुटलेल्या गुन्हेगाराची दगडाने (Stone) ठेचून हत्या (Murder) करण्यात आली आहे. यातच धक्कादायक बाबा म्हणजे त्याच्या वडिलांचाही खून करण्यात आला आहे.

Advertisement

हे खून कोणी केले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. भररस्त्यात हे खून करण्यात आले आहेत. खून केल्यानंतर आरोपी फरार आले आहेत. या खुनांमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

पोलिसांकडून (Police) आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलिसांपुढे आरोपीना (Accused) शोधण्याचे मोठे आव्हान आहे. सनी कुमार शिंदे (वय 22) आणि कुमार शिंदे (वय 55) अशी खून झालेल्या बापलेकांची नावे आहेत.

Advertisement