पुणे : शहरात अल्पवयीन मुलामध्ये गुन्हे (Crime) करण्याचे प्रमाण (Rate) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुण्यातील (Pune) पिंपरी जाधववाडी (Jadhav wadi) येथील चिखलीमध्ये (Chikhali) दुचाकींचा (Two-wheeler) धक्का (Push) लागला म्हणून तरुणाने कानाखाली (Hit under the ear) मारली होती.
याचाच राग मनात धरून १७ वर्षीय अल्पवयीन (Minor) मुलाने दगड मारून खून (Murder) केल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. पोलिसांनी २ अल्पवयीन मुलांवर गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
सुनील शिवाजी सगर (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत मृत व्यक्तीच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) तक्रार (Complaint) दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी मुलांनी सुनील हे कामावरून घरी येत असताना चिखली येथे त्यांना मारहाण केली आणि याच मारहाणीत त्यांचा मृत्यू (Death) आला आहे. या घटनेबाबत पोलीस तपस करत होते.
आरोपी अल्पवयीन मुलांनी खुनासाठी वापरल्या गाडीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. या गाडीच्या आधारे पोलिसांनी शोध सुरु केला असता २ आरोपी पोलिसांना मिळाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलांनी मित्राची दुचाकी नेली होती. त्यावेळी सुनील यांना गाडीचा धक्का लागला होता. त्यावेळी सुनील यांनी मुलाला कानशिलात लावली होती.
याचाच राग मनात धरत मुलांनी सुनील यांना मारहाण केली आणि याच मारहाणीत सुनील यांचा मृत्यू झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज (CCTV Camera) पाहिल्यावर पोलिसाना याबाबत माहिती मिळाली होती.