पुणे – पुणे-नाशिक (pune-nashik) या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी अवघ्या दोन तासांपर्यंत कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा (semi high speed railway) बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकल्प गटांगळ्या खाताना दिसतोय. याबाबत राज्यातील सत्ताधारी जरी आग्रही असले तरी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत वेळोवेळी रेड सिग्नल दाखवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासोबत एक आढावा बैठक आयोजित केली होती.

यामध्ये पुणे- नाशिक (pune-nashik) सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाऐवजी (railway) ‘रेल्वे कम रोड’चा विचार करा, असा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला असून, पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, काल मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनीही महारेलच्या अधिकार्‍यांसोबत बैठक करत नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा संदर्भात रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने सर्व बाबींच्या पुरततेसाठी आवश्यक असलेली कार्यवाही करावी अश्या सूचना केल्या.

रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या सुचंनांची पूर्तता झाल्यानंतर महारेलच्या अधिकार्‍यांना सोबत घेत रेल्वे मंत्र्यांकडे प्रकल्पाचे सादरीकरण केले जाईल. याच वेळी रेल्वे मंत्र्यांना प्रकल्पाची व्यवहार्यताही पटवून सांगण्यात येणार असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रस्तावित असलेला नाशिक-पुणे (pune-nashik) हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुरु असून बारगळण्याच्या स्थितीत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री (devendra fadnavis) यांनी हा प्रकल्प रेल कम रोड धर्तीवर साकारला जाणार असल्याचे सांगितले होते.

त्यामुळे या प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, याबाबत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पुन्हा रेल्वेमंत्र्याशी भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सध्यातरी हा प्रकल्प तळ्यात मळ्यात असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प हा दोन जिल्ह्यातून जात असल्याने या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पत आहेत. शिवाय ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यासाठी 102 गावांमधील एक हजार 450 हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे.

पुणे-नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.