पुणे – पुणे-नाशिक (pune-nashik) या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी अवघ्या दोन तासांपर्यंत कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा (semi high speed railway) बद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकल्प गटांगळ्या खाताना दिसतोय. याबाबत राज्यातील सत्ताधारी जरी आग्रही असले तरी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत वेळोवेळी रेड सिग्नल दाखवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासोबत एक आढावा बैठक आयोजित केली होती.

यामध्ये पुणे- नाशिक (pune-nashik) सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाऐवजी ‘रेल्वे कम रोड’चा विचार करा, असा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला असून, पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनीही महारेलच्या अधिकार्‍यांसोबत बैठक करत नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा संदर्भात हे रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, आता पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबद्दल शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivaji aadhalrao patil) यांनी महत्वाची माहिती दिली असून, विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

“प्रकल्पाची उपयुक्तता व व्यवहार्यता पटवून देणार असून हा प्रकल्प केंद्राच्या अंतिम मान्यतेसह लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivaji aadhalrao patil) यांनी दिली.

ते म्हणाले की, विरोधकांनी वस्तूस्थिती जाणून न घेताच या प्रकल्पाबाबत अपप्रचार सुरू करून केंद्र सरकारवर टीका केली. प्रत्यक्षात केंद्राकडून या प्रकल्पाला कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही.

वास्तविक या प्रकल्पाबाबत महारेलचे व रेल्वेबोर्डाचे अधिकारी यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक झाली असता रेल्वेमंत्री यांनी भारतात पहिल्यांदाच अशाप्रकारे ताशी दीडशे ते दोनशे किलोमीटर वेगाने सेमी हायस्पीड रेल्वे धावणार आहे.

रेल्वे क्रॉसिंग वेळी कुठलाही अपघात वा अनुचित घटना होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही तोपर्यंत आपण पुढे जायला नको, अशी भूमिका रेल्वेमंत्री यांनी मांडली होती.

याचा अर्थ रेल्वेला स्थगिती दिली, हा प्रकल्प बंद केला असा अजिबात होत नाही. मात्र विरोधकांनी उतावळेपणा दाखवित लगेचच प्रकल्प बंद पडल्याच्या अविर्भावात आंदोलनाची भाषा सुरू केली.