पुणे : मकर संक्रांती (Makar sankranti) सणामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) पतंग (Kite) उडवली जाते. पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा (Nylon cats) वापर केला जातो. त्यामुळे अनेक पक्षांचे (Birds) तसेच नागरिकांचेही जीव जातात.

पुणे (Pune) शहरामध्ये अनेक पुलावर हा मांजा अडकतो त्यामुळे दुचाकीस्वरांचा मृत्यू होतो. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील उड्डाणपुलावरून जाताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

नायलॉन मांजावर बंदी असताना तो सर्रास पणे विकला जातो. त्यामुळे हा मांजा मुले खरेदी करतात आणि त्याने पतंग उडवतात. हा मांजा तुटून झाडे, केबल, इमारती, तसेच उड्डाणपुलांवर अडकतो.

Advertisement

त्यामुळे शेकडो पक्षी अडकतात आणि त्यांचा जीव जातो. तसेच उडाणपुलावरही हा मांजा अडकतो त्यामुळे दुचाकीस्वरांना मांजाचा त्रास होतो. काहीवेळा तर दुचाकीस्वाराचा जीवही जातो.

२०१८ मध्ये एका डॉक्टर (Doctor) तरुणीचा नायलॉन मांजामुळेच जीव गेला होता. नाशिक फाटा येथीलच एक उड्डाण पुलावर २६ वर्षीय डॉक्टर तरुणीचा नायलॉन मांजामुळे गळा चिरून मृत्यू (death) झाला होता.

पोलिसांकडून (Police) सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या नायलॉन मांजावर कारवाई केली जात नाही. नायलॉन मांजा विकण्यावर बंदी असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून (Pimpari Chinchwad Police) दोन वर्षांत एकही कारवाई (Action) करण्यात आलेली नाही.

Advertisement

या उड्डाण पुलावर सर्वाधिक धोका

नाशिक फाटा
१. डांगे चौक
२. भोसरीगाव
३. चापेकर चौक, चिंचवडगाव
४. सांगवी फाटा
५. जगताप डेअरी चौक
६. काळेवाडी फाटा
७. दापोडी (सीएमई समोर)
८. भुजबळ चौक, वाकड
९. एम्पायर इस्टेट, चिंचवड
१०. टिळक चौक, निगडी
११. केएसबी चौक, पिंपरी
१२. स्पाईनरोड, जाधववाडी
१३. स्पाईनरोड, मोशी
१४. भक्तीशक्ती चौक, निगडी

Advertisement