पुणे – मधुमेह (Diabetes) या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह (Diabetes) दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. मधुमेहा (Diabetes) आजाराबाबात जनजागृती व्हावी यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन १८ नोव्होंबर रोजी आयोजित केली असून विविध उपक्रम राबविणत येणार आहे, अशी माहिती डॉ. चंद्रहास शेट्टी यांनी नुकतीच दिली.

पुढे शेट्टी म्हणाले, आजचे जागरूकता शिक्षण उद्याचे मधूमेहपासून संरक्षण या घोष वाक्यानुसार मधूमेह संर्दभात जनजागृतीसाठी लायन्स डायबेटिस अवेअरनेस नावाने आम्ही २००४ पासून विविध कार्यक्रम आयोजित करित आहोत.

जनजागृतीचे यंदाचे वर्ष १९ असून १९ वा लायन्स वर्ल्ड डायबेटीस (Diabetes) जागरूकता आणि अवयव दान कार्यक्रम १८ नोव्हेंबर रोजी सकाळपासून आयोजित करण्यात आला आहे.

ह्या उपक्रमात सकाळी ८ वाजता सिटीप्राईड थिएटर ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड या दरम्यान जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.

या रॅलीत विद्यार्थी, खेळाडू, मधूमेह रुग्ण, डॉक्टर्स, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक आणि लायन्स आदी सहभागी होणार आहेत. लायन्स क्लब्स मित्र परिवार, लायन्स क्लब्स ऑफ पुणे २१ सेंचुरी, पॅटरॉन क्लब, पार्टिसिपटिंग क्लब, एन.एम. वाडिया हॉस्पिटल,

स्काय क्लिनिक, सेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल हॉस्पिटल, पतित पावन संघटना, पुणे शहर यांच्या पुढाकाराने हे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर उपक्रमांतर्गत १८ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मधुमेह आणि वैद्यकीय तपासणी शिबीर आणि सकाळी १० ते १२.३० वेळेत मधुमेह आणि अवयवदान या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे.

इन्सुलिन बाबत समज-गैरसमज, मधुमेहाबाबत घ्यावयाची दक्षता, लहान मुलांमधील मधुमेहाची लक्षणे आणि दक्षता, मधुमेहींसाठी आहार, अवयवदानासाठी जनजागृती तणावमुक्त जीवन कसे जगावे या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे दरवर्षी प्रमाणे २०-३० स्टॉल्सचे प्रदर्शन ज्यामध्ये मधुमेह, रक्तातील साखरेची तपासणी, डोळ्यांची तपासणी, प्रतिबंध किंवा व्यवस्थापित करण्यासाठी नवीनतम नवकल्पनांचे प्रदर्शन असणार आहे.