पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जुन्या काळातील आदर्श होते. तर तर नितीन गडकरी (nitin gadkari) हे सध्याचे आदर्श आहेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल (Bhagatsingh Koshyari) बोलत होते.

यावेळी भाषण करताना राज्यपालांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी (nitin gadkari) यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आता यावरून चांगलेच राजकारण तापले असून राज्यपालांना (Bhagatsingh Koshyari) तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केल्याचं दिसून येत आहे.

अश्यातच, पुण्यातील कोथरूड (Pune kothrud) परिसरात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) वतीने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ सडलेल्या मेंदूचा राज्यपाल असा मजकूर असणारे फलक लावण्यात आले आहेत.

हे फलक थोरात उद्यानाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी बॅनर लावण्यात आले आहेत. यावेळी बॅनर वर “छत्रपतींची बदनामी करणारा सडलेल्या मेंदूचा भाज्यापल” असे लिहिण्यात आले.

युवक राष्ट्रवादीचे कोथरूड (Pune kothrud) विधनसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी हे बॅनर लावण्यात पुढाकार घेतला. यावेळी गिरीश गुरनानी म्हणाले की., “महाराजांसारखे पुन्हा कोणी होणे शक्यच नाही आणि राजकीय एकही नेत्यांची तेवढी लायकी नाही,

त्यामुळे असले वक्तव्य करून राज्यपाल यांनी सर्व शिवप्रेमी यांचे मन दुखवली आहेत. असं ते म्हणाले. सध्या कोथरूड (Pune kothrud) मध्ये लावलेले हे फलक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.