पुणे – शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी बुधवारी जेजुरी (jejuri News) गडावर येऊन खंडोबाचं दर्शन घेतल आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी (aditya thackeray) भंडारा-खोबऱ्याची उधळण करत पुजा केली. तसेच, गडावरील एक मण वजणाची प्राचीन तलवार उचलून शक्तीप्रदर्शनही केलं. यावेळी खांद्यावर घोंगडं, माथी भंडारा, हाती तलवार असं आदित्य ठाकरेचं (aditya thackeray) रुप पाहायला मिळालं.

आदित्य ठाकरे हे सांगोला येथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. यानंतर माघारी जाताना त्यांनी जेजुरीत खंडोबाचं दर्शन घेतले आहे. आदित्य ठाकरे येणार असल्याने दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी जेजुरीत (jejuri News) मोठी गर्दी केली होती.

संध्याकाळी त्यांचे जेजुरीत आगमन होताच आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते खंडोबा गडावर गेले.

यावेळी, गडावर गेल्यानंतर खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे यांनी खंडोबाची प्रतिमा देऊन आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. मुख्य मंदिरामध्ये पूजा करून त्यांनी देवदर्शन घेतले.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण खंडोबाच्या दर्शनासाठी आणि आशिर्वादासाठी आलो आहे.असा म्हणत त्यांनी माध्यमांना राजकीय विषयावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. मंदिराच्या आवारात राजकारणावर बोलायला नको असे ते म्हणाले.

यावेळी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. ठाकरे यांनी तळी भंडारही केला. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी गडावर असलेली प्राचीन एक मण वजनाची तलवार उचलण्याचे प्रात्यक्षिक त्यांना दाखवले.

त्यानंतर स्वतः आदित्य ठाकरे यांनीही ही तलवार हातामध्ये उचलून घेतली. यावेळी जेजुरी गडावर शिवसेनेचे अनेक स्थानिक नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार विजय शिवतारे हे शिंदे गटासोबत गेल्याने पुरंदर शिवसेनेला खिंडार पडले असे वाटत होते. मात्र अनेक स्थानिक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

शिवतारे गेल्याने काही फरक पडत नसल्याचे देखील स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यात शिवसेना नव्याने उभी करू, असा विश्वास अनेकांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.