पुणे – पुणे शहरातील (pune news) सर्व बोगस एनए ऑर्डर प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रोहन सुरवसे यांनी महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांच्याकडे निवेदन सादर करून केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, “मी बोगस N.A.ऑर्डर विषयी तक्रार देऊन देखील अद्याप हवेली क्र.३ च्या ११२ प्रकरणांवर कारवाई न करण्यात आली नाही.

११२ बोगस N.A. ऑर्डरची प्रकरणे वगळता २४ प्रकरणांची चोकलिंगम साहेबांच्या बोगस सही च्या N.A.ऑर्डर ची हवेली क्र.३ ची पुराव्यानिशी तक्रार दाखल करून देखील अद्याप कोणतीही कारवाई नाही.

गेल्या मार्च महिन्यामध्ये हवेली क्र.३ ला बोगस N.A.ऑर्डर संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने ११२ प्रकरणे उघडकीस आली.

ती प्रकरणे सोडून मी चोकलिंगम साहेबांच्या नावाने बोगस सही केलेले N.A.ऑर्डर ची मी स्वतः २४ प्रकरणांची पुराव्यानिशी तक्रार दाखल केली तरी अद्याप ११२ व २४ ह्या मधील फक्त १४ प्रकरणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

व बाकीचे सर्व प्रकरणे ही वरिष्ठांनी झाकण्याचा प्रयत्न केलाआहे. यामध्ये यांच्यावर कारवाई न करता दडपणाचा डाव हा वरिष्ठांनी केला आहे. तरी पुणे शहरचे JDR व AO यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी व त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी.

तसेच यांचा या प्रकरणांमध्ये काही सहभाग आहे का ? याचा शोध घ्यावा. बोगस N.A.ऑर्डरची ही सर्व प्रकरणे CBI मार्फत चौकशी करून याचा शोध घ्यावा अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे. यावेळी दिपेश ननावरे उपस्थित होते.