पुणे – केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांग (divyang) सशक्तीकरण विभागाच्या संकेतस्थळावर राष्ट्रीय पुरस्कारासाठी (national awards) दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी दिनांक. 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे (pune) जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे. यासाठी एक अधिकृत वेबसाईट देखील निर्मण केली गेली असून, त्याची लिंक आणि ऑनलाईन पद्धत खाली सांगितली आहे.

दिव्यांग (divyang) व्यक्ती व संस्थांनी 2021 व 2022 च्या पुरस्कारांसाठी गृह मंत्रालयाने तयार केलेल्या https://www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

संकेतस्थळावर उपलब्ध विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह नमूद करावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पुररस्कारासंबधी पात्रता, निकष व इतर सविस्तर तपशील www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

दिव्यांग व्यक्तीच्या (divyang) सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज विचारात घेण्यात येणार असल्याचे कोरगंटीवार यांनी कळविले आहे.

अर्जदाराकडून योग्य त्या कागदपत्रांसह 4 प्रतींमध्ये परिपूर्ण अर्ज 28 ऑगस्ट पर्यंत स्विकारण्यात येतील. प्रस्त पुरस्काराचे अर्ज विहित नमुन्यात

इंग्रजीमध्ये व हिंदीमधील संक्षिप्त माहितीसह व अर्जदाराच्या कार्याविषयी 150 ते 200 शब्दामध्ये इंग्रजीमध्ये तयार करून प्रस्तावास जोडावे. असं देखील यावेळी संगीत आलं आहे.