पुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा नागरिकांनी साजरा केला आहे.

दरम्यान, आता दिवाळी संपून हिवाळा सुरु झाला आहे. सध्या सगळीकडे गुलाबी थंडी (Winter) पडू लागली असून, पुणेकर सुद्धा या थंडीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.

सध्या थंडीमुळे मागील काही दिवसात घटलेली मासळीची (fish rates) आवक दोन दिवसात वाढली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात 5 ते 10 टक्‍क्‍यांनी घट झाल्याची माहिती मासळीचे (fish rates) विक्रेते देत आहेत.

तर, मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंडीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचं दिसून आलं आहे. देशाच्या पूर्व व पश्‍चिम किनारपट्टीवरून मासळी बाजारात दाखल होत आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गणेश पेठ येथील मासळी (fish rates)  बाजारात रविवारी (दि. 6) खोल समुद्रातील मासळीची 10 ते 15 टन, खाडी 300 किलो, तर नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भव) :

पापलेट : कापरी : 1600-1800, मोठे : 1300-1500, मध्यम : 900-1000, लहान : 700-800, भिला : 400-500, हलवा : 480-550, सुरमई : 440-600, रावस : 550-600, घोळ : 660-650, करली : 280-320, करंदी (सोललेली) : 400-440,

भिंग : 300-400, पाला : 900-1200, वाम : 550-600, ओले बोंबील : 140-180. कोळंबी : लहान 140-280, मोठी : 360-550, जंबोप्रॉन्स : 1200-1400, किंगप्रॉन्स : 700-750, लॉबस्टर : 1600-1800, मोरी : 200-280, मांदेली : 100-140,

राणीमासा : 120-180, खेकडे : 250-320, चिंबोऱ्या : 480-550. खाडीची मासळी : सौंदाळे : 200-240, खापी : 160-200, नगली : 300-550, तांबोशी : 400-440, पालू : 200-240, लेपा : 200-240, बांगडा : 100-160, शेवटे : 200-240, पेडवी : 60-80,

बेळुंजी : 100-140, तिसऱ्या : 240-280, खुबे : 100-140, तारली : 120-140. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 160-180, मरळ : 4000-480, शिवडा : 240-280, खवली : 200-240, आम्ळी : 100-160, खेकडे : 300-360,

वाम : 550-600. मटण : बोकडाचे 700, बोलाईचे 700, खिमा 700 कलेजी 700. चिकन 220, लेगपीस 270, जिवंत कोंबडी 150, बोनलेस 320. अंडी : गावरान (शेकडा) 920, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 565, डझन 72, प्रतिनग 6