पुणे – दिवाळीच्या (Diwali) सुट्टीत गावी आलेले चाकरमानी पुन्हा एकदा पुण्या मुंबईच्या परतीच्या प्रवासाला लागले आहेत. चाकरमानी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्या घरी केल्यानंतर आपल्या गावाकडे जातात. त्यामुळे ऐन दिवाळीत (Diwali) चाकरमान्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली होती. शाळेतील सहामाहीच्या परीक्षा संपल्या होत्या. तसेच दिवाळीला (Diwali) सुरुवात झाली आणि त्याआधी आलेल्या साप्ताहीक सुट्टीची संधी साधून अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, आता दिवाळीच्या (Diwali) सुट्टी संपली असून पुन्हा एकदा गावाकडे आलेले चाकरमानी पुण्याच्या (Pune) दिशेने रवाना झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणे स्टेशन (pune station) गर्दीने हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर अनेक लोक पुण्यात परतले आहेत. दिवाळीनंतर गावाकडून परतणाऱ्यांनी पुणे स्टेशनवर (pune station) गर्दी केली आहे. दिवाळीसाठी शेकडो लोक आपल्या घरी परतले होते.

मात्र कामासाठी सगळे आता पुण्यात परत आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक तरुण तरुणी कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी पुण्यात राहतात. आता पुन्हा पुण्यात दाखल झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुणे स्टेशनवर गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळाली.

वाहनांच्या गर्दीने महामार्ग हाऊसफुल्ल…

दिवाळीच्या सुट्टी संपली असून पुन्हा एकदा गावाकडे आलेले चाकरमानी पुणे-मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सातारा-पुणे आणि मुंबई – पुणे महामार्गा वाहनांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाला होत आहे.

महामार्गावर अनेक किमींच्या रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरु होती. साताऱ्यातील सर्व बस स्थानकावरही तुडूंब गर्दी होती. दिवाळीच्या सलग सुट्ट्या संपल्याने पुणे- बंगळूर महामार्गावर कराड, सातारा खंबाटकी घाट, शिरवळ परिसरात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.