पुणे – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. याच कारणामुळे सध्या राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा. तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे.

राज्यपाल म्हणाले होते, “छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते. तर तर नितीन गडकरी (nitin gadkari) हे सध्याचे आदर्श आहेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी म्हटलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल (Bhagatsingh Koshyari) बोलत होते. तसेच, यावेळी भाषण करताना राज्यपालांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी (nitin gadkari) यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

दरम्यान, या व्यक्तव्यानंतर राज्यपालांवर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात (Pune News) राष्ट्रवादीने (Ncp News) आक्रमक होत डमी राज्यपालांचे धोतर फेडण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

पुण्यामध्ये (Pune News) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुण्यातील सावरकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा अशा घोषणा राज्यपाल यांच्या विरोधात देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच इतर राष्ट्रपुरुषांचा वारंवार अपमान करीत असतात.

महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपाने या राज्यपालांना (Bhagatsingh Koshyari) महाराष्ट्राचा वारंवार अपमान करण्यासाठी महाराष्ट्रात नेमलेले आहे अशी टीका राष्ट्रवादी कडून यावेळी करण्यात आली आहे.