पुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. दिवाळी (Diwali) हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागविल्याचा परिणाम देशातील हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे.

शहरी भागांमध्ये हवा बिघडली असून दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचली आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील शहरगावांमध्येही वातावरणावर अतिरेकी फटाक्यांचा परिणाम झाल्याचे ‘सफर’ या संस्थेने नोंदविले आहे.

सफर या संस्थेकडून देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येते. मंगळवारी दुपापर्यंत पुण्याच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक ते वाईट या स्तरावर होती. दुपारनंतर त्यात सुधारणा होऊन ती समाधानकारक पातळीवर गेली.

येत्या दोन दिवसांत पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारण्याची, तर मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट पातळीवरच राहण्याचा अंदाज ‘सफर’कडून वर्तवण्यात आला आहे.

तर देशातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचली आहे. पुढील दोन दिवस दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीरच राहण्याचा ‘सफर’चा अंदाज आहे.

सफरच्या नोंदींनुसार सोमवार-मंगळवारी मुंबईची हवा वाईट पातळीवर, तर पुण्याची हवा वाईट ते मध्यम पातळीवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

हवेतील धूलीकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांना धोका असतो. करोना आटोक्यात आला असला, तरी पावसाळय़ापासून राज्यभरात दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. सध्याच्या हवेत पुन्हा सर्दी-खोकला वाढण्याची भीती आहे.