पुणे – पुणे शहरातील (Pune News) येरवडा (yerawada) येथील विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर गोल्फ क्लब चौकात (golf chowk) महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणार्‍या उड्डाणपुलाचे (flyover) काम 82 टक्के झाले आहे. त्यामुळे पूढील महिन्यात म्हणजेच, डिसेंबर अखेरपर्यंत वाहतुकीसाठी हा पुल (flyover)खुला करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांनी उड्डाणपुलाच्या कामाची बुधवारी पाहणी केली. त्यावेळी उड्डाणपुलाची अंतिम टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली.

यावेळी ते म्हणाले.., “या पुलाचे काम 82 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर अखेर पूल वाहतुकीसाठी खुला होईल. पुलाविषयी माहिती देताना माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक म्हणाले,

मी स्थायी समिती अध्यक्ष असताना वडगावशेरी मतदार संघात चार उड्डाण पूल मंजूर करून घेतले. त्यापैकी गोल्फ क्लब चौकातील उड्डाणपुलास निधीची तरतूद करून ठेवल्याने पुलाचे काम 82 टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेर पूल वाहतुकीस खुला होईल. असं ते म्हणाले.

विमानतळाकडे जाताना तसेच डॉ. आंबेडकर चौक ते डॉन बॉस्को मार्गांवर ये-जा करणार्‍या वाहनांना नेहमी वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. त्यामुळे महापालिकेने या चौकात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता.

याचबरोबर आता खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, या पुलाचे अंतर 650 मीटर असून 10 पिलर वर पूल उभारण्यात आला आहे.

पुलाची रुंदी 15.6 मीटर असून चार लेन असणार आहेत. तसेच, या पुलाच्या कामांतर्गत नागरिकांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी यशवंतनगरजवळ अंडरपास असणार आहे. या पुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे.

पुलाचे काम सुरू होऊन 38 महिने झाले आहेत. कोविडमुळे पुलाचे कामकाज लांबले असून डिसेंबर अखेर पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीस सुरू केला जाईल.

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार…

या पुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सभेत मंजूर झाला आहे. यामुळे हा पूल छत्रपती संभाजी महाराज पूल म्हणून ओळखला जाणार आहे.