पुणे – शहरातून जाणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या (mula-mutha Rivar) पात्रात कचऱ्याचे साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे. शहरातील (Pune) मध्य भागातून एकूण 44 किलोमीटरची ही नदी वाहते. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नदीपत्रात (mula-mutha Rivar) साचले कचऱ्याचे ढीग, पुरात वाहून आलेला कचरा यामुळे संपूर्ण नदीपात्र परिसर घाण झाल्याचं दिसून येत आहे.

मात्र या नद्यांचे पात्र स्वच्छ ठेवायला महापालिका (Pune Municipal) प्रशासन अयशस्वी असल्याचं यातून दिसून येत आहे. पुणे शहरातील नदीपात्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांवर आहे.

सिंहगड, वारजे, कर्वेनगर, घोले रस्ता, औंध बाणेर, शिवाजीनगर या क्षेत्रीय कार्यालयांचा यात समावेश येतो. दरम्यान, मुळा-मुठा नदीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी दरवर्षी करोडो रुपयांचा निधी देखील दिला जातो.

पण तरी देखील नदीपात्राची स्वच्छता नाहीच असा प्रश्न सध्या पुणेकरांना पडला आहे. पुणे महानगरपालिकेकडून स्वच्छ भारत अभियानासाठी दरवर्षी जनजागृती देखील केली जाते, पण नदीपात्रातील कचऱ्याबाबत प्रशासनच जागृत नाही. असा सवाल पुणेकर विचारू लागले आहेत.

मुळा-मुठा नदीचे पात्र सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती…

पुणे महापालिकेकडून मुठा नदीच्या (mula-mutha Rivar) सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेताना नदीच्या दोन्ही बाजूने पर्यावरणपूरक कामे केली जाणार आहेत. मात्र, त्याचा फटका कोथरूड, सिंहगड रस्ता, वारजे या भागातील नागरिकांना बसणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत टिळक पूल ते म्हात्रे पूल दरम्यान असणारा नदी काठचा रस्ता कायमस्वरूपी काढून टाकून तेथे सुशोभीकरण केले जाणार असल्याचे महापालिकेने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेतर्फे पावणे पाच हजार कोटी रुपये खर्च करून मुळा मुठा नदीचा (mula-mutha Rivar) काठ सुशोभित केला जाणार आहे. या प्रकल्पाचे महापालिकेतर्फे सादरीकरण देखील करण्यात आले आहे.

यामध्ये नदीच्या दोन्ही बाजूने पर्यावरण पूरक किनारे विकसित करणे, सायकल मार्ग, बाग याचा समावेश आहे. तसेच नागरिकांना बोटिंगची व्यवस्था केली जाणार आहे.