पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जुन्या काळातील आदर्श होते. तर तर नितीन गडकरी (nitin gadkari) हे सध्याचे आदर्श आहेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल (Bhagatsingh Koshyari) बोलत होते.

यावेळी भाषण करताना राज्यपालांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी (nitin gadkari) यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आता यावरून चांगलेच राजकारण तापले असून मनसेने देखील राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांना (Bhagatsingh Koshyari) तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली असून, मनसेने (mns) देखील याला पाठिंबा दर्शविला आहे.

“राज्यपालांचं वय झालं आहे. त्यांना तात्काळ रिटायर करा’, अशी मागणी मनसेने केली आहे. विरोधकांबरोबर आता मनसेनेही राज्यपालांना हटवण्याची मागणी केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

पुणे शहरातील (Pune) मनसेचे नेते वसंत मोरे यांनी (Vasant More) ही मागणी केली आहे. “एवढ्या मोठ्या उच्च पदावर असणारी व्यक्ती बेताल वक्तव्य करते. जे आपले आदर्श आहेत त्यांच्यावर बोललं जात आहे.

तरीही राज्यपालांवर कारवाई का होत नाही? यांना यांच्या पक्षातले वरिष्ठ का समजावून सांगत नाहीत?, असा सवाल वसंत मोरे (Vasant More) यांनी केला आहे.

वसंत मोरे नेमकं काय म्हणाले..,

“शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहेत आणि तुम्ही त्यांना एकेरी कसं बोलू शकता? मग आम्हाला देखील तुम्हाला एकेरी बोलता येतं. हे राज्यपाल नेहमी कळ लावायचं काम करतात म्हणून मी बोललो यांचं नाव बदलून कळीचा नारद ठेवा.

हे कधी जातीवर बोलून भांडणे लावायचं काम करतात. तर कधी महापुरुषांवर अवमानकारक बोलतात. राज्यपालांचं वय झालं आहे त्यांना रिटायर करा’, अशी मागणीही मोरे (Vasant More) यांनी केली. एका प्रसिद्ध वृत्तवानीच्या मुलाखतीत ते बोलत होते.