पुणे – 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर (Mumbai) झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या (terrorist attack) जखमा ताज्या आहेत. याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी (terrorist attack) मुंबई हादरवून टाकली होती. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले, तर कित्येक लोकांनी आपलं सर्वस्व गमावलं. मुंबई पोलीस, एटीएस अधिकारी, एनएसजी कमांडो, मार्कोस, अग्निशमन जवानांनी प्राण पणाला लावत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

तर तुकाराम ओंबळे यांनी स्वत:चा जीव देऊन अजमल आमीर कसाब या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडलं. त्यानंतर कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील (Pune) येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं.

दरम्यान, 26/11.. च्या मुंबई हल्ल्यात (terrorist attack) ज्या वीरांनी आपले प्राण पणाला लाऊन मोठी जीवित हानी टाळली त्यांच्या कार्याचे आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चिंचवड ते गेट वे ऑफ इंडिया अशा भव्य सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.

रॅली चे हे सहावे वर्ष असून इको पेडलर्स आणि WOW यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅली चे आयोजन केले आहे. लोटस ग्रुप हे त्याचे अधिकृत पुरस्कर्ते आहेत.

रॅली शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रात्री 10 वाजता मुकाई चौक रावेत येथून निघेल आणि सकाळी 9 वाजे पर्यन्त गेट वें ऑफ इंडिया इथे संपेल.

सर्व सहभागी सायकलपटूना मेडल व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे.या रॅलीमध्ये तब्बल 102 जणांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. लोटस ग्रुपचे संतोष कर्णावट रॅली ला फ्लॅग ऑफ करतील.