पुणे – केवळ शिवरायांचा इतिहास सांगणे हा पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांचा हेतू नव्हता तर शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीतून समाजात राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. बाबासाहेबांचे (babasaheb purandare) हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी १५ नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन यापुढे ‘शिवसंस्कार दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असा निर्धार इतिहास प्रेमी मंडळींनी बाबासाहेबांच्या (babasaheb purandare) निवासस्थानी त्यांना अभिवादन करताना व्यक्त केला.

इतिहास प्रेमी मंडळ व गडवडे ट्रेकर्स यांच्या वतीने पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पर्वती पायथा येथील निवासस्थानी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, गडवेडे ट्रेकर्स चे प्रतीक उभे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. मोहन शेटे म्हणाले, राष्ट्रभक्तीने भारलेला समाजच सामर्थ्यसंपन्न देश उभा करू शकेल.

बाबासाहेबांनी (babasaheb purandare) आपले संपूर्ण जीवन शिवचरीत्र प्रचारार्थ समर्पित केले होते, त्यासाठी त्यांनी प्रचंड अभ्यास आणि भ्रमंती देखिल केली होती.

मराठ्यांचा इतिहास सांगतानाच पाश्चात्य देश प्रगतीची भरारी मारत असताना आपण भारतीय कोठे कमी पडलो, याचे ही चिंतन केले पाहिजे असे ते सांगत असल्याचे शेटे यांनी सांगितले. प्रतीक उभे यांनी प्रास्ताविक केले. सामूहिक शिववंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे…

बालपणापासूनच इतिहासाचे असलेले प्रेम उत्तरोत्तर वाढतच गेले. वयाच्या १६व्या वर्षापासून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे, महाराष्ट्राच्या इतिहासाचे, उज्ज्वल परंपरेचे अभ्यासपूर्ण संशोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली.

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करत.

ज्येष्ठ इतिहासकार आणि कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.