पुणे – राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) कमी होताना दिसत नाहीये उलट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राज्यात अपघात होताना दिसून येत आहेत. दरम्यान, या अपघातांमध्ये मोठ्या संख्येने अपघात हे खाड्यांमुळे होत असल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यासह पुण्यातील (Pune) खड्यांमुळं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं जीव मुठीत घेऊन चालकांना वाहनं चालवावी लागत आहेत”. असं मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलं होत.

तसेच, यावेळी ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत, रस्ता खराब झाला असे स्पॉट शोधून रस्ते तत्काळ दुरूस्त करावेत, अशा मागणीचे पत्र पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते.

मात्र, आता अमिताभ गुप्ता आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतीच एकत्रितरित्या शहरातील विविध मार्गांची पाहणी केली. याशिवाय उपस्थित अधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट काही सूचना केल्या आहेत.

या व्यतिरिक्त विनाकारण रस्ते अडवणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही दोन्ही आयुक्तांनी यावेळी दिले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या आरोपांची गंभीर दाखल घेतली.

वाहतूक विभागाची जबाबदारी आणखी एका पोलिस आयुक्तावर सोपवली तर विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही वाहतूक कामे मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

तर महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनीही पाऊस उघडताच शहरातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. शिवाय विविध संस्थांच्या माध्यमातून भाग देऊन अधिक ट्राफिक वार्डन उपलब्ध करून दिले आहे.

सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic issue) होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि या त्रासाला आता सामान्य पुणेकर देखील चांगलाच वैतागला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी शहारात सुरू असलेल्या विविध प्रकल्पाची पाहणी केली. दोन्ही आयुक्त संयुक्तरित्या दौरा करणार असल्याने अतिक्रमण विभागाची पथके दिसून आली.

यानंतर त्यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत गणेश खिंड रस्ता, पुणे विद्यापीठ चौक, बाणेर, चांदणी चौक, नवले पूल आणि सिंहगड रस्ता परिसरात दोघांनी पाहणी केली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.