पुणे – पर्यावरणाचा (natural grass carpet) होणारा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता पुण्यातील (Pune) पर्यावरण प्रेमींनी सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरणाचा प्रसार व्हावा यासाठी देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालीच्याची (natural grass carpet) निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेल्या १००० स्क्वेअर फुट गालीच्याची (natural grass carpet) जागतिक स्तरावरही नोंद घेतली जात आहे. पुणे – सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी जवळी पेठ नायगाव येथे या पर्यावरण प्रेमींनी गालीचा निर्मितीचा प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर पर्यावरण प्रेमी भेट देत आहेत.

प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीच्या जिबॉय तांबी यांनी पुणे सोलापूर रस्त्यालगत कुंजीरवाडी येथे हा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये नैसर्गिक रित्या पर्यावरण पूरक गवतापासून गालीच्या (natural grass carpet) तयार करण्यात आला आहे.

हा गालीच्या (natural grass carpet) केवळ घरामध्येच नव्हे तर मोठ्या स्तरावर क्रीडांगणामध्ये, उद्यानांमध्ये, गोफ कोर्समध्ये, घराच्या परसबागेमध्ये ही वापरता येऊ शकतो.

हा गालिचा वापरण्यासाठी ही अतिशय सोपा असून तसेच देखभाल खर्च ही अतिशय कमी आहे. दोन ते तीन दिवसातून एकदा या गालीच्याला पाणी दिले तरी हा गालिचा अत्यंत हिरवागार आणि टवटवीत राहतो.

हा गालिचा पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर तर आहेच तसेच शारीरिक दृष्ट्या ही या गालीचाचे अनेक फायदे आहेत. या गालीच्या वर चप्पल न घालता चालले तर त्याचा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोग होतो.

या प्रकल्पामधून शेतकऱ्यांना तसेच तरुणांनाही उद्योग आणि व्यवसाय निर्मितीसाठी मदत होऊ शकेल यामधून स्थानिक तरुणांनाही रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

हा गालीचा काळ्या मातीत बरोबर समुद्रालगत असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या आणि कोकणातील लाल मातीतही अत्यंत चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते.

कमी पावसाच्या तसेच जास्त पावसाच्या प्रदेशातही चांगल्या प्रमाणात वाढतो. पावसाचे प्रमाण अधिक असेल तरीही या गालीच्या मधून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही.

नैसर्गिक रित्या तयार करण्यात आल्या असल्यामुळे या गालीच्या मध्ये कोणत्याही विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य होऊ शकत नाही.

त्यामुळे हा घरामध्ये आणि बागेमध्येही अतिशय संरक्षित दृष्ट्या वापरता येऊ शकतो. पुण्यासह केरळ मधील कोचीन आंद्र प्रदेश येथील हैदराबाद या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर या गालीचाची निर्मिती करण्यात येत आहे.

त्यामुळेच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये घरपोच हा गालिचा पर्यावरण प्रेमींपर्यंत पोहोचवण्याची सोयही करण्यात आल्याचे जिबॉय तांबी यांनी माहिती यांनी दिली.